ठाण्‍यात विशेष मुलांसाठी आंतरशालेय स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्‍यात विशेष मुलांसाठी आंतरशालेय स्पर्धा
ठाण्‍यात विशेष मुलांसाठी आंतरशालेय स्पर्धा

ठाण्‍यात विशेष मुलांसाठी आंतरशालेय स्पर्धा

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ (बातमीदार) : जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग धारा प्रतिष्ठान संस्कारभारती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय संवाद सेतू नाट्यस्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नाट्य, नृत्यनाट्य, एकपात्री नाट्य या प्रकारचे सादरीकरण झाले. मतिमंद मुले-मुली, अनाथ आश्रमातील मुले-मुली, आदिवासी विद्यार्थी व पालक यांच्यासाठी नाट्य स्पर्धा तसेच अंध मुलांसाठी वैयक्तिक गीतगायन स्पर्धा व सामुदायिक गीतगायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्‍पर्धेमध्ये एकूण चार संस्थांनी सहभाग घेतला होता. या संस्थांचे मिळून एकूण सात कार्यक्रम पार पडले. यामध्ये जिद्द विशेष शाळा, जागृती पालक संघटना, सामलिनी कर्णबधीर विद्यालय व जीवन संवर्धनी अशा चार संस्थांमध्ये ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेचा निकाल ७ जानेवारी रोजी दादर येथे जाहीर होणार आहे.