शिवळे महाविद्यालयात पत्रकारितेतील संधी विषयावर कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवळे महाविद्यालयात पत्रकारितेतील संधी विषयावर कार्यशाळा
शिवळे महाविद्यालयात पत्रकारितेतील संधी विषयावर कार्यशाळा

शिवळे महाविद्यालयात पत्रकारितेतील संधी विषयावर कार्यशाळा

sakal_logo
By

मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : जनसेवा शिक्षण मंडळ संचलित शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी व तत्त्वज्ञान विभाग आयोजित ‘पत्रकारितेतील संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी सह्याद्री टीव्ही वाहिनीच्या वृत्तनिवेदिका दीपाली केळकर, ‘साम टीव्ही’चे वरिष्ठ निर्माते गणेश रूपाले व ‘महाराष्ट्र टाइम्स’चे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत मोरे यांनी मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांना प्रसारमाध्यमांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. संकटातून संधी प्राप्त होते, असे प्रतिपादन प्रशांत मोरे यांनी केले. गणेश रूपाले यांनी प्रसारमाध्यमांच्या काही तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. दीपाली केळकर यांनी प्रकट मुलाखतीचे सूत्रसंचालन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. मीना सुतवणी यांनी केले. प्रभारी प्राचार्या डॉ. गीता विशे यांनी मनोगत व्यक्त केले. समन्वयक म्हणून डॉ. सुनीलदत्त गवरे, डॉ. संजय चिताळकर व डॉ. प्रमोद पाटील यांनी काम पाहिले.