पनवेल महापालिकेला प्रवेशद्वाराचा विसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल महापालिकेला प्रवेशद्वाराचा विसर
पनवेल महापालिकेला प्रवेशद्वाराचा विसर

पनवेल महापालिकेला प्रवेशद्वाराचा विसर

sakal_logo
By

खारघर, ता. १५ (बातमीदार) : पनवेल पालिका हद्दीत प्रवेश करण्यासाठी खारघर, रोहिंजण, घोट, तळोजा एमआयडीसी, पळस्पे, उरण आणि कर्जत रोड असे सहा प्रवेश मार्ग आहेत; परंतु पालिकेने कोणत्याही ठिकाणी स्वागत प्रवेशद्वार उभारले नसल्याने दुसऱ्या शहरांमधून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्याने पालिकेला प्रवेशद्वाराचा विसर पडल्याचा नागरिकांकडून केला जात आहे.
ज्या शहरात आपण वास्तव्य करतो, त्या शहराचा अथवा वस्तीचा अभिमान प्रत्येकालाच असतो. पनवेल पालिका स्थापन होऊन सहा वर्षे उलटली; मात्र एकही प्रवेशद्वारावर स्वागताचे प्रवेशद्वार नाही. नवी मुंबईतून पनवेल पालिका हद्दीत प्रवेश करताच निसर्गरम्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या खारघर शहर, पुणे आणि कोकणातून पळस्पे मार्गे पनवेल शहरात प्रवेश होतो. तसेच शिळफाटा मार्गे रोहिंजण येथील धानसर टोलनाका आणि घोट गाव आणि कल्याण ग्रामीण भागाची हद्द समाप्त होताच तळोजा एमआयडीसी मार्गे पनवेल पालिका हद्दीत प्रवेश करावा लागतो. मात्र, या सहाही मार्गीकेवर पालिकेने प्रवेशद्वार उभारले नाही. पालिकेला प्रवेशद्वारचा विसर पडला की काय असा प्रश्न पालिका हद्दीतील रहिवासियांकडून विचारला जात आहे. याविषयी पालिकेचे शहर अभियंता संजय जगताप यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
-----------------------
पालिकेची माहिती आणि ओळख निर्माण व्हावी, यासाठी पनवेल पालिकेच्या प्रवेशद्वार असलेल्या रस्ता, तसेच वसाहतीत प्रवेशद्वार उभारावे, असे पत्र पालिका प्रशासनाकडे पाठविले आहे. मात्र, पालिकेकडून कोणत्याही प्रकारे उत्तर मिळाले नाही.
- दीपक शिंदे, रहिवासी, खारघर
--------------------------
पनवेल पालिका अस्तिवात आल्यानंतर पालिकेने सिडकोकडून घनकचरा, रस्ते, उद्यान व इतर सुविधा हस्तांतरण केल्या आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी बरोबर पत्रव्यवहार करून पालिका हद्दीतील सर्व प्रवेश मार्गांवर स्वागत फलक लावण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- परेश ठाकूर, माजी सभागृहनेता