Tue, Jan 31, 2023

कल्याण पूर्वमध्ये शनिवारी महारोजगार मेळावा
कल्याण पूर्वमध्ये शनिवारी महारोजगार मेळावा
Published on : 15 December 2022, 9:52 am
कल्याण, ता. १५ (बातमीदार) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांच्यामार्फत शनिवारी (ता. १७) पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा कल्याण पूर्व येथील चक्की नाका चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच मनीषा वर्मा, उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन. इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये ठाणे येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.