Thur, Feb 2, 2023

कल्याणमध्ये शनिवारी रोजगार मेळावा
कल्याणमध्ये शनिवारी रोजगार मेळावा
Published on : 15 December 2022, 11:17 am
कल्याण, ता. १५ (बातमीदार) : राज्यातील गरजू युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कल्याण पूर्व परिसरातील चक्की नाका येथील गुण गोपाळ मंदिर मैदानात शनिवारी (ता. १७) सकाळी १० वाजता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. गरजू तरुण, तरुणींनी https://jobfairkalyan.globalsapio.com या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांनी केले आहे.