
आरव्ही युनिव्हर्सिटीतर्फे प्रवेशप्रक्रिया
बेंगळूरु, ता. १५ : बेंगळूरुमधील आरव्ही युनिव्हर्सिटीने वर्ष २०२३-२४ साठी प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेस, स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग, स्कूल ऑफ डिझाईन अॅण्ड इनोव्हेशन, स्कूल ऑफ लिबरल आर्टस् अॅण्ड सायन्सेस आणि नवीन लाँच करण्यात आलेले स्कूल ऑफ लॉ या सहा स्कूल्समध्ये त्यांच्या पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. आरव्ही युनिव्हर्सिटी अध्यापन, संशोधन, क्षमता बांधणी आणि सामुदायिक सहभागामध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील आहे, असे विद्यापीठाचे व्हाइस चान्सलर प्राध्यापक वाय. एस. आर. मूर्ती यांनी सांगितले. भारताची सिलिकॉन व्हॅली आणि इनोव्हेशन हब असलेल्या बेंगळूरुमध्ये शिक्षण घेतल्याने अनेक संधी उपलब्ध होतात, असे आरव्हीयूचे प्रो-व्हाईस चान्सलर डी. पी. नागराज म्हणाले.