माता, मुलांच्या आरोग्यसाठी आरोग्य विभाग सरसावला नवविवाहित जोडपी आणि गरोदर महिलांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माता, मुलांच्या आरोग्यसाठी आरोग्य विभाग सरसावला
नवविवाहित जोडपी आणि गरोदर महिलांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय
माता, मुलांच्या आरोग्यसाठी आरोग्य विभाग सरसावला नवविवाहित जोडपी आणि गरोदर महिलांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय

माता, मुलांच्या आरोग्यसाठी आरोग्य विभाग सरसावला नवविवाहित जोडपी आणि गरोदर महिलांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : संपूर्ण महाराष्ट्रात माता निरोगी राहाव्यात आणि मुले जन्माला यावीत, या उद्देशाने राज्याच्या आरोग्य विभागाने आता नवविवाहित जोडपी आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी ते आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील दोन तालुक्यांत याबाबत काम सुरू झाले आहे.
‘सरकारी योजनेचा एक भाग म्हणून आम्ही सर्व सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहोत, ज्यात बॉडी मास इंडेक्स, हिमोग्लोबिन पातळी आणि नवविवाहित महिलांच्या आरोग्याच्या इतर गंभीर समस्या तपासतील आणि त्यांची मुले निरोगी आहेत की नाहीत, याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करू, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
...
उपक्रमाचा विस्तार
माता आणि मुलांसाठीच्या या उपक्रमाचा विस्तार होणार असून टप्प्याटप्प्याने अकोला, बुलढाणा, लातूर, नांदेड, अकोला, धुळे, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतही राबवला जाईल.
...
‘माता सुरक्षित...’ अहवालाच्या आधारे...
‘माता सुरक्षित, घर सुरक्षित’ या मोहिमेच्या अहवालाच्या आधारे एक योग्य कृती योजना तयार करण्यात आली आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अनेक महिलांना अॅनिमिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि मानसिक-संबंधित समस्यांचे निदान झाले आहे. त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कृती आराखडा देण्यात आला आहे,’ असे कुटुंब कल्याण, बाल संगोपन आणि शालेय आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
...
विविध आजारांची तपासणी
राज्याच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कार्यक्रमांतर्गत नवविवाहित जोडप्यांची विशेषत: महिलांची मधुमेह, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), एचआयव्ही, रक्तगट, वजन, उंची, हिमोग्लोबिन आणि सिकलसेल, जुनाट आजारांची स्थिती, उच्च रक्तदाब, क्षयरोग, गंभीर अशक्तपणा, अपस्मार, हृदयाचे आजार, प्रजनन संक्रमण आणि गलगंड यांसारख्या आजारांबाबत त्यांची तपासणी केली जाईल.
...
...तर तज्ज्ञांकडे पाठवणार!
१८.५ पेक्षा कमी किंवा २५ पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या कोणत्याही महिलेला वैद्यकीय तज्ज्ञांकडे पाठवले जाईल, जे त्यांच्या आरोग्य विसंगतींसाठी चाचणी करतील. जर एखाद्या महिलेला यापैकी कोणतीही वैद्यकीय स्थिती असल्यास तिला पुढील उपचारांसाठी डॉक्टरांकडे पाठवले जाईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.