थकीत कर भरा अन्यथा दोन टक्के अधिक आकारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकीत कर भरा अन्यथा दोन टक्के अधिक आकारणी
थकीत कर भरा अन्यथा दोन टक्के अधिक आकारणी

थकीत कर भरा अन्यथा दोन टक्के अधिक आकारणी

sakal_logo
By

वसई, ता. १५ (बातमीदार) : मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांनी कर भरावा, अन्यथा कर भरेपर्यंत प्रत्येक महिन्याला २ टक्के शास्ती आकारणी करण्यात येईल, असा इशारा वसई-विरार महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने दिला आहे.
वसई-विरार शहरात अनेक रहिवासी, वाणिज्य मालमत्ताधारकांनी आपला कर थकवला आहे. हा थकीत कर भरण्याबाबत स्मरणपत्र देऊनही अनेकांनी करभरणा केलेला नाही. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे महापालिकेने दर महिन्याला दोन टक्के शास्ती कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या थकबाकी करदात्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याने असे नागरिक कर भरण्यासाठी पुढे येतील, असे महापालिकेचे म्हणणे आहे. महाराष्ट्र महापालिका १९४९ अधिनियम अनुसूची ‘ड’ प्रकरण ८ कराधान नियम ४१ अन्वये हे पाऊल प्रशासनाने उचलले आहे.
वसई-विरार महापालिका कर वसुलीसाठी अनेक माध्यमातून प्रयत्न करत असते. नळजोडणी खंडित करणे, जप्ती, मालमत्ता लिलाव यासह पाच वर्षांचा कर भरणाऱ्यांना सुटदेखील देण्यात येते. मात्र रहिवासी व वाणिज्य वापर करणारे थकबाकीदार कर भरत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर परिणाम होत आहे.
----------------
मालमत्ता धारकांनी कर थकीत ठेवला असेल तर तो लवकरत लवकर प्रभाग समितीच्या मालमत्ता कर संकलन विभागाकडे भरावा. कर भरेपर्यंत दोन टक्के शास्ती कर लागणार आहे. त्यामुळे कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त