मुंबई-पुणे महामार्गावर १,६६० चालकांनावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-पुणे महामार्गावर १,६६० चालकांनावर कारवाई
मुंबई-पुणे महामार्गावर १,६६० चालकांनावर कारवाई

मुंबई-पुणे महामार्गावर १,६६० चालकांनावर कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुन्या महामार्गावर वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकाच्या चुकांमुळे रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रस्ते अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ उपक्रमांतर्गत गेल्या तेरा दिवसांत १,६६० वाहनचालकांवर कारवाई केली.
अपघातांना आळा घालण्यासाठी आरटीओच्या विशेष पथकाने कारवाई सुरू केली आहे. ‘सुरक्षा’ हा उपक्रम १ डिसेंबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी सुरू केला आहे. परिवहन उपायुक्त भरत कळसकर यांनी सांगितले की, १ ते १३ डिसेंबर या कालावधीत मुंबई-पुणे जुना मार्ग आणि मुंबई-पुणे नवीन द्रुतगती महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ६६० वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई मुंबई-पुणे नवीन द्रुतगती महामार्गावर करण्यात आली आहे. नवीन द्रुतगती महामार्गावर गेल्या तेरा दिवसांत १ हजार २९९, तर जुन्या मुंबई-पुणे जुना मार्गावर ३६१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
...
असे आहे विशेष पथक
मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बारा पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांत ३० अधिकारी आहेत. प्रत्येकी सहा पथके दोन्ही मार्गावर कार्यरत आहेत.
......
नऊ महिन्यांतील कारवाई
महामार्ग पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७ हजार ३५० वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल एक कोटीपेक्षा जास्त दंड वसूल केला.
...
कारवाई अशी
अतिवेग- ३६३
लेनकटिंग - ५०५
विनासिटबेल्ट -५२७
चुकीचे पार्किंग -२६५
...
असे आहे दंड
विनासिटबेल्ट- ५०० रुपये
लेन कटिंग - १ हजार रुपये
ओव्हर स्पीड - दुचाकी १ हजार / चारचाकी वाहन २ हजार
चुकीचे पार्किंग - ५०० रुपये