निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्यक : रवींद्र चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्यक : रवींद्र चव्हाण
निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्यक : रवींद्र चव्हाण

निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्यक : रवींद्र चव्हाण

sakal_logo
By

कासा, ता. १५ (बातमीदार) : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. यामुळे निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
डहाणूतील चारोटी येथील व्यायामशाळेचे उद्‌घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यायामशाळेचे संचालक फरीद मनेशीया, आमदार श्रीनिवास वनगा, निरंजन डावखरे, माजी आमदार अमित घोडा, विलास तरे, तहसीलदार अभिजित देशमुख आदी उपस्थित होते.
पूर्वी प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा होत्या, तसेच कुस्तीसाठी तालीम मिळत असे, त्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य चांगले असायचे. पण आधुनिकतेच्या काळामध्ये हे सर्व लुप्त होत चालले आहे. त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. हे सर्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
....
‘घर तिथे नळ’ ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डहाणू नगर परिषद यांच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पणप्रसंगी सांगितले. यावेळी खासदार राजेंद्र गावित, नगराध्यक्ष भरत राजपूत, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.