जी-२० अध्यक्षपदाचा कालावधी स्मरणीय होण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जी-२० अध्यक्षपदाचा कालावधी स्मरणीय होण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न
जी-२० अध्यक्षपदाचा कालावधी स्मरणीय होण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न

जी-२० अध्यक्षपदाचा कालावधी स्मरणीय होण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : भारताच्या जी-२० अध्यक्षपदाचा कालावधी आठवणीत राहावा, यासाठी मध्य रेल्वेकडून विविध प्रकाशने, वेबसाइट्स, स्टेशनरी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोगोचा वापर करण्यात येणार आहे. जी-२० लोगोचे ब्रँडिंग, ट्रेनच्या आत, टीव्ही स्क्रीन, पोस्टर्स, बॅनर इत्यादींद्वारे करण्यात येईल, असे रेल्वेने कळवले आहे. 
रेल्वेने म्हटले आहे की, जी-२० लोगो भारताच्या राष्ट्रध्वजाच्या व्हायब्रंट रंगांपासून प्रेरणा घेतो. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल पृथ्वी ग्रहाला जोडते. पृथ्वी ग्रह हा भारताचा जीवनाविषयीचा समर्थक दृष्टिकोन प्रतिबिंबित करतो, जो निसर्गाशी परिपूर्ण सुसंगत आहे. जी-२० लोगोच्या खाली देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले ‘भारत’ आहे. भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची थीम ‘वसुधैव कुटुंबकम्’ किंवा एक पृथ्वी - एक कुटुंब - एक भविष्य प्राचीन संस्कृत मजकुरातून काढलेली आहे. भारताच्या जी-२० अध्यक्षतेचा लोगो आणि थीम एकत्रितपणे एक शक्तिशाली संदेश देतात, जो जगातील सर्वांसाठी न्याय्य वाढीसाठी प्रयत्नशील आहे.