Sun, Jan 29, 2023

बनावट लिंकचा वापर करून महिलेला लाखाचा गंडा
बनावट लिंकचा वापर करून महिलेला लाखाचा गंडा
Published on : 16 December 2022, 1:05 am
अंधेरी, ता. १६ (बातमीदार) : महाविद्यालयामध्ये मुलांच्या शैक्षणिक परीक्षेची फी भरण्यासाठी सायबर भामट्यांनी बनावट लिंकचा वापर करून महिलेला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ४८ वर्षीय तक्रारदार ही आपल्या कुटुंबासह मालाड परिसरात वास्तव्य करते. तिचा मुलगा अकरावीत शिकत आहे. त्याच्या शाळेची फी भरण्यासाठी एका लिंकवर पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. महिलेच्या मोबाईलवर सायबर भामट्याने एक लिंक पाठवत ती उघडली असता फीचा भरणा केला. महिलेला तिच्या डेबिट कार्डमधून पैसे काढल्याचे मेसेज आले. त्यांच्या बँक खात्यातून एक लाख रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मालाड पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली.