२०२५ मध्ये चंद्रावर महिलेचे पहिले पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२०२५ मध्ये चंद्रावर महिलेचे पहिले पाऊल
२०२५ मध्ये चंद्रावर महिलेचे पहिले पाऊल

२०२५ मध्ये चंद्रावर महिलेचे पहिले पाऊल

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : ‘नासा’च्या माध्यमातून २०२५ मध्ये ‘आर्टेमिस- ३’ हे मानवरहीत यान चंद्रावर उतरवले जाणार आहे. त्यासाठी पुरुषासोबत एका महिलेला पाठवले जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच चंद्रावर एका महिलेचे पाऊल पडणार असल्याची माहिती नासाच्या सहप्रशासक कॅथरिन लुएडर्स यांनी दिली. नासाकडून या अभियानात विशेष म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा आणि त्यासोबतच रंगभेद आदी बाजूला ठेवून समतेचा संदेश दिला जाणार आहे, तो संदेश घेऊन यामध्ये महिला आणि पुरुष चंद्रावर उतरणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आयआयटी मुंबईत आजपासून सुरू झालेल्या ‘टेकफेस्ट’ या तंत्रज्ञान महोत्सवात आयोजित केलेल्या परिसंवादात कॅथरिन लुएडर्स यांनी ‘२०५० पर्यंत जागतिक अवकाश’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘नासा’कडून यापूर्वी अनेकदा पुरुषांना चंद्रावर पाठविण्यात आले आहे. ‘अपोलो’ मोहिमेअंतर्गत १९६९ ते १९७२ दरम्यान १२ पुरुष अंतराळवीर चंद्रावर उतरले होते. त्यात यापूर्वी गौरवर्णीय पुरुष पाठवण्यात आले होते. त्यानंतरच्या मोहिमेतही अनेक पुरुष पाठवले; परंतु त्यामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आले नव्हते; मात्र पहिल्यांदाच चंद्रावर महिलेला पाठवणार असून, सोबत कृष्णवर्णीयांनाही स्थान दिले जाणार आहे. तसेच महिलेला चंद्रावर पाठवताना जगभरात रंगभेद, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणार असल्याचे कॅथरिन लुएडर्स यांनी सांगितले.

२०२५ नंतर ३० दिवसांचे मिशन
२०२५ मधील ‘आर्टेमिस-३’ मोहिमेसाठी नासाने महिलेची निवड केली आहे. ग्रीक पुराणकथेमध्ये मातृदेवतांना मोठे स्थान आहे, त्यामध्ये आर्टेमिस ही चंद्राची देवी म्हणून तिला स्थान आहे. नासाकडून २०२५ मध्ये ‘आर्टेमिस-३’ अभियान राबवल्यानंतर पुन्हा ३० दिवसांचे वेगळे मिशन राबवले जाणार आहे. त्यामध्ये दोन आठवडे माणूस चंद्रावर राहील, अशी त्यात योजना असल्याची माहिती कॅथरिन लुएडर्स यांनी दिली.

मंगळावर सहा महिन्यांचा प्रवास
पुढील काही वर्षे नासाकडून मंगळावर मानवासह यान पाठविण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविला जात आहे. त्याचे आव्हान नासाने स्वीकारले आहे. अनेक अडचणी आणि त्यात येणाऱ्या तांत्रिक बाबींवर काम सुरू करण्यात आले आहे. मंगळावर मानव पाठविण्यासाठीच्या अभियानात एकूण ९ महिन्यांचा जाण्याचा आणि तितकाच येण्याचा प्रवास असेल. त्यात ६ महिने तिथे राहून सर्व अभियान यशस्वी केले जाणार असल्याची माहिती कॅथरिन लुएडर्स यांनी दिली.