Sun, Jan 29, 2023

दुचाकीस्वारांचे मंगलसूत्र खेचून पोबरा
दुचाकीस्वारांचे मंगलसूत्र खेचून पोबरा
Published on : 16 December 2022, 2:53 am
ठाणे, ता. १६ (वार्ताहर) : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आंबेडकर सोसायटीसमोर रस्त्यावरून चालणाऱ्या ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगलसूत्र खेचून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वृद्धेने ठाणेनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी या रस्त्याने पायी जात असताना, आंबेडकर सोसायटीसमोर आल्या असता, त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येत फिर्यादी वृद्धेच्या गळ्यातील १ लाख १० हजारांचे मंगलसूत्र खेचत पोबारा केला. या वृद्धेने ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला.