मिरा रोडमध्ये मद्यधुंद तरुण -तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा रोडमध्ये मद्यधुंद तरुण -तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा
मिरा रोडमध्ये मद्यधुंद तरुण -तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा

मिरा रोडमध्ये मद्यधुंद तरुण -तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा

sakal_logo
By

नालासोपारा, ता. १६ (बातमीदार) : मिरा रोडच्या एका हॉटेलमध्ये मद्यधुंद होऊन तरुण-तरुणीचा भररस्त्यावर धिंगाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय हद्दीतील कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. मिरारोड पूर्व गौरव वुडस फेस टू, युनिक गार्डन्स, गौरव सिटी या उच्चभ्रू सोसायटी परिसरातील लुडो लाँच या हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये मद्यधुंद अवस्थेत दोन तरुण आणि दोन तरुणी वादविवाद करत असून या वादात एक तरुणी निर्वस्त्र झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर लुडो लाँच या हॉटेलबाहेर काही नागरिकही दिसत आहेत. हा परिसर रहिवासी इमारतीचा असून येथील राहिवाशांनी अनेक वेळा पोलिसांना तक्रारी केल्या आहेत; पण त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

लुडो लाँच या हॉटेलमधून बाहेर निघालेले तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत असतात, रस्त्यावर बसतात, मध्यरात्री २ ते ४ वाजेपर्यंत त्यांचा धिंगाणा सुरू असतो. आमच्या मुलांनाही आम्ही बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. हे सर्व चित्र पाहून आमच्या लहान मुलांना आम्ही काय दाखवतोय, असा प्रश्न आमच्यासमोर पडतोय, त्यामुळे पोलिसांनी या अशा अश्लील प्रकारावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मीनाक्षी तोष्णीवाल, महेश भुरके यांच्यासह अन्य स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

लुडो लाँच या हॉटेलला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातील निर्वस्त्र झालेली व्यक्ती ही तृतीयपंथी आहे. याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल नाही.
- जयवंत बाजबळे, पोलिस उपायुक्त परिमंडळ- ०१


आमच्या हॉटेलला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. हॉटेलमध्ये सहकुटुंब ग्राहक येत असतात. येणाऱ्या गेस्टची आम्ही सर्व काळजी घेतो; पण बाहेर कोण काय करते, याला आम्ही जबाबदार नाही. आमच्या हॉटेलमध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर ती जबाबदारी आमची आहे. शनिवारी जो प्रकार घडला तो चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे. त्यातील तरुणी नसून तृतीयपंथी आहे.
- गिरीश राठोड, हिशेबनीस, लुडो लाँच हॉटेल, मिरा रोड