बहीण भावांचा डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात धिंगाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहीण भावांचा डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात धिंगाणा
बहीण भावांचा डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात धिंगाणा

बहीण भावांचा डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात धिंगाणा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : टिटवाळा येथे राहणारी शशी पांडे ही प्रवासी महिला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आसनगाव लोकलने टिटवाळा येथे जात होती. डोंबिवलीजवळ एका महिला टीसीने त्यांच्याकडे लोकलचे तिकीट तपासण्यासाठी मागितले. शशी यांच्याजवळ तिकीट नसल्याने टीसीने त्यांच्याकडे दंडाची रक्कम मागितली. यावर शशी यांना राग आल्याने त्यांनी महिला टीसीसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात करत धक्काबुक्की केली. डोंबिवली रेल्वे स्थानकात शशी यांना उतरवून संबंधित महिला टीसीने घडलेल्या प्रकाराबाबत डोंबिवली रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदवली. या दरम्यान शशी यांनी आपल्या दोन्ही भावांना बोलावून घेतले. या बहीण-भावांनी मिळून डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ घालत पोलिस कर्मचाऱ्यांनादेखील धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी नितीन पांडे व सर्वेश पांडे या दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली.