
मुगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
किन्हवली, ता. १८ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र विशे यांच्या प्रयत्नातून मुगावसाठी मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन बांधकाम व आरोग्य सभापती वंदना भांडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
आदिवासी उपाययोजनेच्या माध्यमातून १० लाख रुपये निधी मंजूर करून आणलेला प्रमुख रस्ता, जलजीवन मिशन प्रकल्प, जनसुविधेतून मंजूर झालेल्या नूतन ग्रामपंचायत कार्यालय, पंधरावा वित्त आयोगातून व्यायाम साहित्य खरेदीसाठी अडीच लाख रुपये मंजूर करून आणलेले अंतर्गत रस्ते अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, शिवसेना विभाग प्रमुख दीपक लकडे, सरपंच किसन मुकणे, उपसरपंच दिनेश विशे, माजी उपसरपंच आशा विशे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.