बाबू मोरे यांना शरद पवार इंस्पायर फेलोशिप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबू मोरे यांना शरद पवार इंस्पायर फेलोशिप
बाबू मोरे यांना शरद पवार इंस्पायर फेलोशिप

बाबू मोरे यांना शरद पवार इंस्पायर फेलोशिप

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : शिक्षण, साहित्य आणि कृषी क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यातील नेतृत्वासाठी प्रेरित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या देदीप्यमान कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी १२ डिसेंबर २०२१ पासून ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बाबू मोरे यांच्या ‘विद्यार्थी ज्ञानपती, पालक लखपती’ या उपक्रमाची फेलोशिपसाठी मागील आठवड्यात निवड करण्यात आली होती. या फेलोशिपधारकांचा सन्मान सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. यावेळी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. सी. डी. माई आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आला. याबद्दल विक्रमगडचे गटशिक्षणाधिकारी बी. बी. शिनगारे, डोल्हारी बु. चे सरपंच विलास गहला, सीपीएमचे जिल्हा सचिव किरण गहला, केंद्र प्रमुख शंकर हडबाळ, शिक्षक सुधाकर दराडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चिनू कुशल, सामाजिक कार्यकर्ते राजा गहला यांनी अभिनंदन केले.