Mon, Jan 30, 2023

बोरिवलीच्या प्रभारी सरपंचपदी फरहान सुसे
बोरिवलीच्या प्रभारी सरपंचपदी फरहान सुसे
Published on : 18 December 2022, 9:14 am
पडघा, ता. १८ (बातमीदार) : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भिवंडी तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी फरहान सुसे यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच नादिरा शेख यांनी चार महिन्यांकरिता रजा घेतल्याने भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांच्या आदेशानुसार एक विशेष खास सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी प्रभारी सरपंच पदाचा कार्यभार उपसरपंच फरहान सुसे यांना देण्यात आला. यावेळी ग्रामसेवक आर. जे. म्हस्के, अकबर खोत, साजिल शेख, रश्मी सुसे, अन्वर शेख, नुरैन नाचण, तकदिस मुल्ला, आश्विनी कशिवले, आमरीन कासकर, मुजीब कासकर, अंजू दिवे या सर्व सदस्यांनी उपस्थित राहून फरहान सुसे यांचे अभिनंदन केले.