Sun, Feb 5, 2023

अशोक भोईर यांचा सन्मान
अशोक भोईर यांचा सन्मान
Published on : 18 December 2022, 9:11 am
कल्याण, ता. १८ (बातमीदार) : दिव्यांग बंधू भगिनींच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भोईर यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.