‘पराभक्ति दिन’ साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पराभक्ति दिन’ साजरा
‘पराभक्ति दिन’ साजरा

‘पराभक्ति दिन’ साजरा

sakal_logo
By

जन्‍मशताब्‍दी महोत्‍सवानिमित्त ‘पराभक्ती दिन’
मुंबई, ता. १८ ः भगवद् भक्ती आणि जनसेवा यांचा दुर्मिळ संगम असलेल्या प्रमुख स्वामी महाराज यांच्‍या जन्‍मशताब्‍दी महोत्‍सवानिमित्त अहमदाबादमध्ये ‘पराभक्ती दिन’ साजरा करण्यात आला. उत्‍सवाच्‍या तिसऱ्या दिवशी नारायण सभागृहातील प्रमुख स्वामी महाराज नगरस्थित सभेला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात पाच वाजता पारायण पूजन विधी व देवाचे नामस्मरण-कीर्तनाने झाली. बीएपीएस संस्थेचे विद्वान संत पूज्य आदर्शजीवन स्वामी यांनी आपल्या वक्तव्यातून प्रमुखस्वामी महाराजांची अखंड ईश्वरभक्ती दर्शविली. जेयर इंटिग्रेटेड वैदिक अकादमीचे संस्थापक श्री श्री श्री त्रिदंडी चिन्ना श्रीमन्नारायण रामानुज जेयर स्वामी, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला, गुजरात लॉ सोसायटी युनिव्हर्सिटीचे अध्‍यक्ष सुधीर नानावटी, माजी महाधिवक्ता सुरेश शेलत, सीए डॉ. गिरीश आहुजा आदी मान्‍यवर या वेळी उपस्थित होते. आयसीएआयचे अध्यक्ष देवाशीष मित्रा कार्यक्रमाचे मुख्य वक्ते होते. अहमदाबाद आयसीएआयचे अध्यक्ष सीए बिशन शाह, आयसीएआय केंद्रीय परिषद सदस्य पुरुषोत्तम खंडेलवाल, आयसीएआय माजी अध्यक्ष सुनील तलाटी, आयसीएआय उपाध्यक्ष अनिकेत तलाटी इत्यादी मान्यवरही सहभागी झाले होते.