‘त्यांनी’ लुटला थरारक खेळाचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्यांनी’ लुटला थरारक खेळाचा आनंद
‘त्यांनी’ लुटला थरारक खेळाचा आनंद

‘त्यांनी’ लुटला थरारक खेळाचा आनंद

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : दैनंदिन कार्यपद्धती, रोजचा अभ्यास यातून बाहेर पडून विरंगुळा म्हणून अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो. यामुळे शरीरासह मनाला असलेली एक प्रकारची मरगळ दूर होते. शारीरिक आणि मानसिकरित्या कमकुवत असणाऱ्यांसाठी हे एक प्रकारचे औषधच. याच धर्तीवर तालुक्यातील अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा झडपोली या शाळेत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
अंध व मतिमंद मुलांना थरारक खेळाचा आनंद लुटता यावा यासाठी मॅजिक किंग्डम येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुलांनी विविध थरारक ॲक्टिव्हिटी करत खेळाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. झुलत्या दोरीवरून चालताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह होता. तेथील विविध खेळण्यांवर मुलांनी खेळ खेळले. साऊंड सिस्टीमवर मुलांनी मनमुराद नृत्य केले. या दिवसाचा मुलांनी पूर्णपणे आनंद लुटला.
कार्यक्रमाची सांगता मुलांनी प्रार्थना व वंदे मातरम घेऊन करण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश गायकवाड व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच येथील थरारक ॲक्टिव्हिटीसाठी मदत करणारे सर्व कर्मचारी उपस्थित होते.