मुलींच्या शिक्षणाला महापालिकेकडून प्रोत्साहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलींच्या शिक्षणाला महापालिकेकडून प्रोत्साहन
मुलींच्या शिक्षणाला महापालिकेकडून प्रोत्साहन

मुलींच्या शिक्षणाला महापालिकेकडून प्रोत्साहन

sakal_logo
By

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच पर्यावरण संवर्धनाला हातभार लागावा, या दृष्टिकोनातून मिरा-भाईंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागाकडून आठवीत शिकणाऱ्‍या मुलींना सायकलींचे नुकतेच वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्‍या अनेक विद्यार्थिनी ग्रामीण भागात राहतात. अनेक वेळा शाळा लांब असल्याने या विद्यार्थिनी शाळेत येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे या विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, शाळेतील विद्यार्थिनींची संख्या वाढीस लागावी, तसेच पर्यावरण रक्षणाला हातभार लागावा, या दृष्टीने महापालिका शाळेत आठवीत शिकणाऱ्‍या दोनशे मुलींना महिला बालकल्याण विभागाकडून नुकतेच सायकलींचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दहावीच्या परीक्षते ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही सायकल तसेच बारावीच्या परीक्षते ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त मारुती गायकवाड, सहाय्यक आयुक्त संजय दोंदे, महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती मीरादेवी यादव आदी उपस्थित होते.