एक धाव स्वच्छ नवी मुंबईसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक धाव स्वच्छ नवी मुंबईसाठी
एक धाव स्वच्छ नवी मुंबईसाठी

एक धाव स्वच्छ नवी मुंबईसाठी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ ः स्वच्छता आणि आरोग्य या परस्परपूरक गोष्टी असून धावणे हा आरोग्यासाठी अत्यंत उत्तम व्यायाम मानला जातो. त्यामुळे धावण्याच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनासह शहर स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी ‘लेट्स सेलिब्रेट फिटनेस’ अंतर्गत झालेल्या ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ मध्ये ३२५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
नवी मुंबई महापालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकारातून पाम बीच मार्गावर सकाळी स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनचा शुभारंभ २१ किमी गटापासून करण्यात आला. त्यानंतर अर्ध्या तासाने १० किमी व अर्ध्या तासाने ५ किमी गटातील धावपटू धावले. यावेळी २१ किमी अंतराच्या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये १४ ते २९ वयाच्या पुरुष गटातील बबन शिंदे यांनी १ तास ११ मि. ३७ सेकंदात २१ किमी अंतर पार करून सर्वोत्तम कामगिरी केली. महिलांमध्ये ३० ते ४४ वयोगटातील जयलक्ष्मी बालकृष्णन यांनी १ तास ४४ मि. ५५ सेकंदांत २१ किमी अंतर पार करून प्रथम पारितोषिक पटकाविले. ४५ ते ५९ वर्षे महिला गटात पूजा नायर यांनी १ तास ५४ मि. १३ सेकंदांत २१ किमी अंतर पार केले, तसेच ३० ते ४४ पुरुष गटात शशी दिवाकर यांनी १ तास १८ मि. १४ सेकंदांत, ४५ ते ५९ पुरुष गटात पुरण सिंघल यांनी १ तास ३८ मि. ३ सेकंदांत, ६० वर्षे व त्यापुढील वयोगटात सुनील शेट्टी यांनी १ तास ५२ मि.३ सेकंदांत २१ किमी अंतर पार केले.
याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ १ चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, वाहतूक विभागाचे सहा. पोलिस आयुक्त राहुल गायकवाड, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी सुखदेव येडवे उपस्थित होते.
ः----------------------------------
शहर स्वच्छतेच्या संदेश प्रसारणासाठी ‘लेट्स सेलिब्रेट फिटनेस’ सेवाभावी संस्थेने स्वत: पुढाकार घेऊन हा उपक्रम केला. या स्पर्धेतून नवी मुंबई शहराप्रती असलेले प्रेम अभिव्यक्त करण्यात आले.
-रिचा समित, संस्था प्रमुख