बालाजी टेकडी परिसरात तरुणीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालाजी टेकडी परिसरात तरुणीवर अत्याचार
बालाजी टेकडी परिसरात तरुणीवर अत्याचार

बालाजी टेकडी परिसरात तरुणीवर अत्याचार

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : नेरूळ येथील बालाजी टेकडी परिसरात मित्रासह फिरण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर कथित पोलिसाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात पोलिसाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील पीडित बुधवारी रात्री ८.३० वाजता क्लासमधून सुटल्यानंतर मित्र मैत्रिणींसह बालाजी मंदिरालगत असलेल्या टेकडीवर फिरण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी तरुणी आपल्या मित्रासह थांबली असता टेकडीवर आलेल्या एका कथित पोलिसाने तिच्या मित्राला त्या ठिकाणावरून दमदाटी करून पिटाळून लावले व त्यानंतर तरुणीवर अत्याचार केल्याचे तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात पोलिसावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.