उमेदवारांच्या भवितव्यावर मतदारांचा शिक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेदवारांच्या भवितव्यावर मतदारांचा शिक्का
उमेदवारांच्या भवितव्यावर मतदारांचा शिक्का

उमेदवारांच्या भवितव्यावर मतदारांचा शिक्का

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १८ (वार्ताहर)ः पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठीची मतदान प्रक्रिया रविवारी शांततेत पार पडली. यावेळी ४७ मतदान केंद्रांवर पोलिसांसह २८२ कर्मचारी वर्गाने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत..... टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली.
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कडक बंदोबस्तात सुरू असलेल्या या निवडणुकीत मतदानासाठी केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. यावेळी पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमधील शिवकर, नितलस, भाताण, कानपोली, दिघाटी, करंजाडे, शिरढोण, चिंध्रण, केळवणे, नेरे येथे थेट सरपंचपदासाठी चुरस असल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे. यापैकी शिरढोण, केळवणे, दिघाटी, चिंध्रण, कानपोली, नेरे या सहा ग्रामपंचायती भाजप व भाजपप्रणीत आघाडीकडे होत्या; तर शिवकर, भाताण, करंजाडे, नितळस या चार ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षासह ग्रामविकास आघाडी, महाविकास आघाडीकडे होत्या. त्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या मतांच्या विभाजनामुळे लढती चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
--------------------------
दहा ग्रामपंचायतींमधील पदांची संख्या
सरपंचपदासाठी - २४ उमेदवार
सदस्यपदासाठी - ९४ जागा
बिनविरोध सदस्य -१२
८२ सदस्यपदासाठी - १८३ उमेदवार
------------------------
येथे चुरशीच्या लढती
दहा ग्रामपंचायतीपैकी शिवकर, नेरे व चिंध्रण या मोठ्या ग्रामपंचायतींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिवकर ग्रामपंचायतीमध्ये चुरशीची लढत होणार असून दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. चिंध्रणमध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी हे भाजपचेच असल्याने या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे; तर नेरे ग्रामपंचायतीमध्ये शेकाप, भाजप आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे.