Fri, Feb 3, 2023

विक्रमगडमध्ये शालेख स्पर्धा उत्साहात
विक्रमगडमध्ये शालेख स्पर्धा उत्साहात
Published on : 18 December 2022, 11:46 am
विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : येथील श्री एज्युटेक प्रायमरी स्कूल येथे विविध खेळांच्या शालेयस्तरावरील स्पर्धा उत्साहात पार पडल्या. दोन दिवस सुरू असलेल्या स्पर्धेत लेमन स्पून, हॉपिंग अँड जम्पिंग रेस, बकेट बॉल्स, रनिंग रेस, फॉग जंप रेस, म्युझिक स्टिक, पोटॅटो रेस आदी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भानुशाली यांनी केले; तर स्पर्धा यशस्वीरित्या होण्यासाठी शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.