नौदल ताफ्यात मुरगाव दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नौदल ताफ्यात मुरगाव दाखल
नौदल ताफ्यात मुरगाव दाखल

नौदल ताफ्यात मुरगाव दाखल

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ ः प्रोजेक्ट १५ बी युद्धनौका बांधणी प्रकल्पातील सर्वांत अत्याधुनिक क्षेपणास्त्रधारी विनाशिका मोरमुगोवा हिला आज येथील नौदल गोदीतील विशेष समारंभात नौदल ताफ्यात दाखल करून घेण्यात आले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नौदलप्रमुख आर. हरिकुमार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई आदी मान्यवर या वेळी हजर होते.
ही युद्धनौका विशाखापट्टणम वर्गातील दुसरी विनाशिका आहे. युद्धनौकेचे डिझाईन नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने केले असून ती माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात आली. गोव्यातील अत्याधुनिक बंदराचे नाव दिलेल्या या युद्धनौकेच्या समुद्री चाचण्या गोवामुक्तिदिनाच्या ६० व्या वर्धापनदिनी म्हणजे मागील वर्षी १९ डिसेंबर रोजी सुरू झाल्या होत्या.
युद्धनौकेवर अत्याधुनिक शस्त्रे व शत्रूची लक्ष्ये हुडकण्यासाठी सेन्सर आहेत. यात पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी (शत्रूची विमाने व क्षेपणास्त्रे हवेत नष्ट करण्यासाठी) क्षेपणास्त्रे तसेच शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्यासाठी रॉकेट आणि टॉर्पेडो आहेत. शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी युद्धनौकेवर हेलिकॉप्टरदेखील आहेत. वेगवेगळ्या प्रकारची लांब पल्ल्याची टेहळणी रडारही बोटीवर असून त्यांना मिळालेल्या शत्रूच्या युद्धनौका, विमाने आदींच्या तपशिलानुसार मार्मुगाव युद्धनौकेवरून त्यांच्यावर हल्ला केला जाईल. जैविक, रासायनिक व अण्विक युद्धातही ही नौका तग धरून राहू शकेल, अशी तिची रचना आहे.
...
७५ टक्के भाग स्वदेशी निर्मितीचा
या युद्धनौकेचा ७५ टक्के भाग स्वदेशी निर्मितीचा असून क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो ट्यूब व लाँचर, पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर, शत्रूच्या विमानांवर वेगाने मारा करणाऱ्या गन, युद्धप्रणाली, पॉवर मॅनेजमेंट सिस्टिम, प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टिम, सोनार व अन्य शस्त्रे स्वदेशी बनावटीची आहेत.
...
अशी आहे मोरमुगोवा...
नौसैनिक व खलाशी - ३००
लांबी - १६३ मीटर
रुंदी - १७ मीटर
वजन - ७,४०० टन
ताशी कमाल वेग - ३० नॉट (५५ किमी)
वैशिष्ट्य - शत्रूच्या रडारवर दिसत नाही.