ठाण्यात आगीच्या दोन दुर्घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात आगीच्या दोन दुर्घटना
ठाण्यात आगीच्या दोन दुर्घटना

ठाण्यात आगीच्या दोन दुर्घटना

sakal_logo
By

ठाणे, ता. १८ (वार्ताहर) : पाचपाखाडी येथे १२ व्या माळ्यावर रविवारी लाकडी सामानाला आणि वर्तकनगर ज्ञानेश्वर मंदिराजवळ कचऱ्याला आणि विद्युत डीपीला आग लागल्याच्या दोन घटना घडल्या. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ठाण्याच्या पाचपाखाडी चंदनवाडी परिसरात कालिका हाईट्स या इमारतीच्या १२ व्या माळ्यावर राहणाऱ्या मनोज साठे यांच्या गॅलरीत ठेवलेल्या लाकडी सामानाला आग लागली होती. सकाळी ११ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी आग विझवली. रविवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास वर्तकनगर भीमनगर ज्ञानेश्वर मंदिराजवळ मोकळ्या जागेत पडलेल्या कचऱ्याला आग लागली. ही आग पसरत जवळच असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपीला लागली. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने तब्बल अर्धा तास कसरत करत आगीवर नियंत्रण मिळवले. या दोन्ही घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.