
पालघर जिल्ह्यात सरासरी ७८.६३ टक्के मतदान
पालघर जिल्ह्यात ७८.६३ टक्के मतदान
पाललार, ता. १८ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या; मात्र त्यापैकी पालघर तालुक्यातील नावझे ग्रामपंचायत सरपंचासह बिनविरोध झाल्याने आज ६२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सरासरी ७८.६३ टक्के मतदान झाले असून काही ग्रामपंचायतींमध्ये ८५ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे.
पालघर तालुक्यात ३१, वसईमध्ये १५, वाडा येथे १४ व तलासरी येथे एक याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. पालघर तालुक्यात ४८,७९१; तर वसईत २९,४३७, वाडा येथे १४,१८९ व तलासरी येथे १३२५ मतदार होते. दुपारी ३.३० वाजेपर्यंत पालघर तालुक्यात ६४.३३ टक्के, वसईत ६६.४३, वाडा ७७.९७; तर तलासरी येथे ७९.७० टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांचा ओघ वाढला होता.
सायंकाळी ५.३० नंतरची टक्केवारी
पालघर ७७.३८
वसई ७६.३४
वाडा ८६.९७
तलासरी ८६.११
जिल्हा ७८.६३