एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर ई-बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर ई-बस
एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर ई-बस

एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर ई-बस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : इलेक्ट्रिक वाहन धोरणाअंतर्गत एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहन आणण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. सुमारे ५,१५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भात एसटी महामंडळाने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी राज्यभरातील एसटी आगारांमध्ये जागेची उपलब्धतेची नुकतीच आढावा बैठक पार पडली. आगार परिसरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांवर एसटी महामंडळ स्वखर्चाने उच्च क्षमतेची चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.

एसटीच्या ताफ्यात सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनातून भविष्यात प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनबरोबरच सीएनजी स्टेशन उभारण्याचा प्रयत्नसुद्धा एसटी महामंडळाचा असल्याचे दिसून येत आहे. जागा उपलब्ध असल्याच्या आढावा बैठकीत सीएनजी पंप उभारण्यासाठी विचार केला जात आहे. अनेक आगार व्यवस्थापकांनी दोन्ही पद्धतीच्या वाहनवापरासाठी जागा उपलब्ध असल्याची माहिती एसटीच्या मुख्यालयाला पुरवली आहे.

२५० किमीपर्यंत बस फेऱ्या
बस पुरवठादारच चालकसुद्धा पुरवणार आहे. २०० ते २५० किलोमीटर अंतरापर्यंत या इलेक्ट्रिक बसच्या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

जागा उपलब्ध नसलेली स्थानके
बीड, परळी, परभणी, गंगाखेड, देवरूख, मालवण, काटोल, तुमसर, साकोली, चंद्रपूर, वर्धा, तळेगाव, संभाजीनगर, राधानगरी, कुरुंदवाड, गडहिंग्लज, सासवड, कराड, सातारा, फलटण, महाबळेश्वर, शेवगाव, साक्री, जामनेर, चोपडा, अमळनेर, नाशिक, अकोला, मूर्तिजापूर, रिसोड, तेल्हारा, पांढरकवडा, दिग्रस, राळेगाव