Mon, Jan 30, 2023

पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर
पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर
Published on : 19 December 2022, 11:14 am
बोर्ड, ता. १९ (बातमीदार) : पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार पोलिस दलाच्या वतीने घोलवड पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस भरती प्रशिक्षण शिबिर सोमवारी बोर्डी ग्रामपंचायत क्रीडा मैदानात पार पडले. यावेळी पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे, सहपोलिस निरीक्षक मयूर शेवाळे व प्रशिक्षक शंकर सांगळे यांनी या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. घोलवड पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ५० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रशिक्षणांतर्गत शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा घेऊन पोलिस भरतीच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.