सायकलिंगद्वारे वाहतूक कोंडीची जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकलिंगद्वारे वाहतूक कोंडीची जनजागृती
सायकलिंगद्वारे वाहतूक कोंडीची जनजागृती

सायकलिंगद्वारे वाहतूक कोंडीची जनजागृती

sakal_logo
By

ठाणे, ता. १९ (बातमीदार) : घोडबंदर परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्‍भवत आहे. या वाहतूक कोंडीने घोडबंदर रोडला विळखा घातला आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे, याविषयी जनजागृती करण्यासाठी घोडबंदर सायकलिस्ट क्लबने १६० किलोमीटर अंतराची सायकल राईड आयोजित केली होती. यात तब्बल ६५ सायकलिस्टनी सहभाग घेतला होता.
रविवारी (ता. १८) सकाळी ५ वाजता माजिवडा येथून या सायकल राईडला सुरुवात झाली. अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते राईडला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जीआरएम १६० असे या राईडचे नाव होते. ग्रुपचे गोपाल साबे पाटील, अजिंक्य कुंकोळकर, प्रतीक सावंत, रैना भटनागर, काके यांच्या संकल्पनेतून या राईडचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, मुंबई, शहरांतील ६५ सायकल रायडर्स सहभागी झाले होते. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी सायकलिंगकचा वापर असा संदेशदेखील या वेळी देण्यात आला. ही राईड माजिवडा घाटकोपर- वाशी-उरण फाटा-पनवेल-खोपोली या मार्गे जाऊन पुन्हा बेलापूरवरून ठाणे येथे विसर्जित करण्यात आली. डीकॅथलोन येथे सर्व रायडर्सना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.