चिमुकले बनले स्वच्छता दूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकले बनले स्वच्छता दूत
चिमुकले बनले स्वच्छता दूत

चिमुकले बनले स्वच्छता दूत

sakal_logo
By

मालाड, ता. १९ (बातमीदार) ः ब्लू सी क्लिनिंग मोहिमेंतर्गत मालाड पश्चिमेतील दानापाणी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून कीप होप अलाईव्ह या संस्थेच्या वतीने येथे स्वच्छता केली जात आहे. हे कार्य अविरत चालत राहावे या उद्देशाने सांस्थेच्या सदस्यांनी समाजासोबत हे कार्य पुढे नेण्याचे ठरवले व यंदा मालवणीतील मदर तेरेसा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले. या चिमुकल्यांनी किनारा स्वच्छ करताना उत्साह दाखवत आनंद लुटला तसेच आपले पर्यावरण रक्षणाचा त्यांनी प्रत्यक्षात कृती करत धडाही शिकला. या वेळी पर्यावरण रक्षणाबाबत या चिमुकल्या स्वच्छतादुतांनीही केला आहे. त्‍यांनी घरी जाऊन आई, वडील आणि भावाबहिणीला या पर्यावरण रक्षणाची माहिती देऊन स्वच्छ मुंबईचा संदेश सर्वत्र पसरवण्याचा निर्धार केला.