
सिग्निफायकडून फिलिप्स ओ-बल्स व हेक्सा-बल्ब सादर
मुंबई, ता. १९ : सिग्निफाय या लायटिंगमधील जागतिक अग्रणी कंपनीने भारतात दोन खास आकाराचे एलईडी बल्ब्स फिलिप्स हेक्सा-बल्ब आणि ओ-बल्ब लाँच केले. षटकोनी व गोलाकार आकाराचे बल्ब्स डेकोरेटिव्ह लाईट्स म्हणून वापरता येऊ शकतात. दोन्ही बल्ब्समध्ये सुलभ प्लग-एन-प्ले फॉर्म आहे, ज्यामुळे हे बल्ब्स विद्यमान एलईडी बल्ब्स सॉकेट्समध्ये सहजपणे इन्स्टॉल करता येऊ शकतात. हे बल्ब डोळ्यांना आरामदायी वाटेल अशा स्वरूपात डिझाईन करण्यात आले असून हे नियमित वक्राकार-आकाराच्या एलईडी बल्ब्सच्या तुलनेत व्यापक भागापर्यंत प्रकाश प्रसारित करतात. या लाँचबाबत बोलताना सिग्निफाय दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुमित जोशी म्हणाले, ‘लायटिंगमधील जागतिक अग्रणी म्हणून सिग्निफाय नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. भारतात टी-बल्ब श्रेणी यशस्वीरीत्या निर्माण केल्यानंतर आम्हाला नावीन्यपूर्ण आकाराच्या एलईडी बल्ब्सची आमची नवीन श्रेणी फिलिप्स हेक्सा-बल्ब व ओ-बल्ब लाँच करण्याचा आनंद होत आहे. या बल्ब्सची स्लीक डिझाईन तुमच्या घरातील इंटीरिअर्सना सुशोभित करू शकते, तसेच आयकम्फर्ट टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या डोळ्यांना या बल्ब्समधून प्रसारित होणाऱ्या प्रकाशाचा त्रासदेखील होत नाही.’