पथविक्रेत्यांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथविक्रेत्यांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचा पुढाकार
पथविक्रेत्यांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचा पुढाकार

पथविक्रेत्यांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचा पुढाकार

sakal_logo
By

पनवेल, ता. १९ (वार्ताहर)ः प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत महापालिकेच्यावतीने दहा हजारांचे पथविक्रेत्यांना भांडवल साह्य म्हणून खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. बँकांनी आजवर महापालिकेला प्रधानमंत्री स्वनिधी योजना राबवण्यास सहकार्य केले आहे, पण यापुढेही संबंधित बँकांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत राहिलेल्या अर्जदारांना सहकार्य करून त्यांची कर्ज मंजूर करावीत, अशा सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी केली आहे. महापालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (डेएनयुलएम) विभागाच्यावतीने सर्व बँक प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
एमएमआरडीए विभागामध्ये पनवेल महापालिका प्रधानमंत्री स्वनिधी वाटपामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कामामध्ये बँक अधिकाऱ्यांची भूमिका खूप मोठी आहे. त्यांनी सहकार्य केल्यामुळे पनवेल महापालिका उत्तम प्रकारे काम करू शकली, याबद्दल उपायुक्त कैलास गावडे यांनी बँक अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच बँकांकडे पेंडिंग असलेल्या केसेसविषयी माहिती देऊन, बँकांनी महापालिकेला सहकार्य करण्याविषयी सूचित केले. नगरपथविक्रेते अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नगरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, पण कोविड- १९च्या टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी पनवेल महापालिका सहकार्य करत आहे.
--------------------------------
दरमहा हप्त्याने परतफेडीची मुभा
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या अंतर्गत विशेष सूक्ष्म पतपुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरता नुकतेच बँकांच्या सहकार्याने चारही प्रभागांमध्ये विशेष शिबिर राबवण्यात आले आहे. यामध्ये पथविक्रेत्यांना एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह १० हजारपर्यंतचे खेळते भांडवली कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असणार आहेत.
--------------------------------
आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड, २) बँक पासबुक, ३) मोबाईल नं. आधार कार्डला लिंक पाहिजे, ४) रेशन कार्ड / लाईट बिल. ५) पासपोर्ट साईज फोटो, ६) बाजार फी वसुली पावती.