Thur, Feb 2, 2023

फटाके विझवण्याच्या प्रयत्नात पोलिस जखमी
फटाके विझवण्याच्या प्रयत्नात पोलिस जखमी
Published on : 19 December 2022, 3:25 am
मुंबई, ता. १९ : माहीममध्ये मखमूद शाह बाबा यांच्या उर्स मिरवणुकीदरम्यान फटाके विझवण्याच्या प्रयत्नात एक पोलिस हवालदार जखमी झाला. रविवारी (ता. १८) संध्याकाळच्या वेळी माहीम भागातील एका शाळेसमोर ही घटना घडली. उर्स मिरवणुकीत सहभागी असलेल्या काही जणांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली. मिरवणुकीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस हवालदाराने पायाने फटाके विझवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सदर पोलिस हवालदार जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केले आहे.