भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते हे भारताचे वास्तव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते हे भारताचे वास्तव
भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते हे भारताचे वास्तव

भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते हे भारताचे वास्तव

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते, प्रदूषण हे भारताचे वास्तव असल्याचे इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यातील राजम येथे जीएमआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते देशाचे वास्तव आहे, असे सांगत त्यांनी भारताची सिंगापूरशी तुलना केली आणि तेथे स्वच्छ रस्ते आणि प्रदूषणमुक्त वातावरण असल्याचे सांगितले. मूर्ती पुढे म्हणाले, की एखाद्या व्यक्तीने बदल घडवण्याची संधी शोधली पाहिजे. एक नेता म्हणून स्वतःची कल्पना केली पाहिजे. दुसऱ्याच्या बाजूने बदल करण्याचा प्रयत्न करू नये.
भारतातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते, प्रदूषण आणि वारंवार वीज नसणे आहे; मात्र स्वच्छ रस्ते, प्रदूषणमुक्त वातावरण आणि मुबलक विजेची उपलब्धता, हे सिंगापूरमधील वास्तव आहे. त्यामुळे नवीन वास्तव निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे, असेही ते म्हणाले.
...
राष्ट्राचे हित जपायला शिका!
नारायण मूर्ती या वेळी म्हणाले, की तरुणांनी समाजात बदल घडवून आणण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे. वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक, समाज आणि राष्ट्राचे हित जपायला शिकले पाहिजे. गरिबी हटवण्याचा आणि समाजातील उपेक्षित घटकांना मदत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अधिक रोजगार निर्माण करणे होय, असेही ते म्हणाले. या वेळी जीएमआर ग्रुपचे चेअरमन जीएम राव यांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
...
मूर्ती तरुणांसाठी प्रेरणास्थान!
जीएमआर ग्रुपचे अध्यक्ष जीएम राव म्हणाले, की नारायण मूर्ती तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. इन्फोसिसची स्थापना आजपासून ४१ वर्षांपूर्वी झाली. ही भारतातील सर्वांत मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे.