Sun, May 28, 2023

सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयपदी हेमंत संखे
सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयपदी हेमंत संखे
Published on : 20 December 2022, 10:36 am
बोईसर, ता. २० (बातमीदार) : पालघर-दापोलीचे नवनिर्वाचित सरपंच हेमंत दिनकर संखे यांची सरपंच परिषदेच्या पालघर जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासकामांसह इतर क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्याच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात सरपंच परिषदेचे सभासद वाढविण्याच्या दृष्टीने नोंदणी करण्याची सूचना संखे यांना सरपंच परिषदेने केली आहे. याशिवाय तालुका समन्वयक नियुक्ती करण्याचा अधिकारही त्यांना देण्यात आला असल्याचे सरपंच परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर केले आहे.