ठाणे मुख्यालयातील व्याख्यानमालेला पोलिसांचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे मुख्यालयातील व्याख्यानमालेला पोलिसांचा प्रतिसाद
ठाणे मुख्यालयातील व्याख्यानमालेला पोलिसांचा प्रतिसाद

ठाणे मुख्यालयातील व्याख्यानमालेला पोलिसांचा प्रतिसाद

sakal_logo
By

ठाणे, ता. २१ (वार्ताहर) : २४ तास कर्तव्यावर असलेल्या, कौटुंबिक आणि सामाजिक तणावाखाली कार्यरत असलेल्या पोलिस बांधवांसाठी ज्ञानप्रकाश यात्रा विभाग, मनशक्ती केंद्राद्वारे व्याख्यानमालेचे आयोजन ठाणे पोलिस आयुक्तालय येथे करण्यात आले होते. ज्ञानप्रकाश यात्रा विभाग, मनशक्ती केंद्र, लोणावळा यांच्या वतीने ‘व्यवसाय, नोकरी, कौटुंबिक व सामाजिक ताणतणाव कमी करण्याचे उपाय’ या विषयावर ठाणे पोलिस स्‍कूलच्या सभागृहात व्याख्यानमाला पार पडली. यावेळी तणावाखाली असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनावरील दडपण कमी करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला. या व्याख्यानमालेत १६० पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमावेळी व्याख्याते मयूर चंदने यांनी पोलिसांना ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानाचे अनेक प्रकार सांगून प्रात्यक्षिके करून घेतली. व्‍याख्‍यानाबाबत उपस्थित पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी समाधान व्यक्त केले.