Tue, Feb 7, 2023

ठाण्यात पाईपलाईन फुटण्याचे सत्र सुरूच
ठाण्यात पाईपलाईन फुटण्याचे सत्र सुरूच
Published on : 21 December 2022, 10:05 am
ठाणे, ता. २१ (वार्ताहर) : ठाण्याच्या बाळकूम फायर स्टेशनच्या बाजूला असलेली पाईपलाईन फुटून पुन्हा हजारो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. या पंधरवड्यातील पाईपलाईन फुटल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ११ आणि १४ डिसेंबर रोजी पातलीपाडा आणि कोपरी परिसरात पाईपलाईन फुटलेली होती. यातही लाखो लिटर पाणी वाया गेले होते. ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीच्या आधारे बाळकूम फायर स्टेशनच्या बाजूला असलेल्या ठाणे महापालिकेची पाईपलाईन फुटल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत हजारो लिटर पाणी वाहून गेले. आपत्ती व्यवस्थापनाने त्वरित संबंधित विभागाला दुरुस्तीच्या कामाबाबत सूचना केली.