जय भारतने पटकावला स्वराज्य चषक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जय भारतने पटकावला स्वराज्य चषक
जय भारतने पटकावला स्वराज्य चषक

जय भारतने पटकावला स्वराज्य चषक

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेमधील स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे सदस्य व उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू संतोष चकवे यांच्या स्मरणार्थ माणेकलाल मैदानात महिला व पुरुष अशा दोन्ही गटांसाठी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा स्वराज्य चषकचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांच्‍या आठ आणि पुरुषांच्‍या १६ संघांनी सहभाग घेतला होता. यात महिलांमध्ये जय भारत चेंबूर; तर पुरुषांमध्ये युनिट श्री गणेश पार्कसाईट हे अंतिम विजयी संघ ठरले. महिलांच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून जय भारत चेंबूरच्या ऊर्वशी पारेख; तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून याच संघाच्या रविता सिंग आणि उत्कृष्ट गोलंदाज सवि शिरीसकर यांची निवड करण्यात आली; तर पुरुष संघात पुरुष सर्वोत्कृष्ट खेळाडू युनिट श्री गणेश पार्कसाईटचा वैभव सुनील गुरसळे; तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून मी मुंबईकर घाटकोपरचा शाहरुख खान आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मी मुंबईचाच सोनू शेख याची निवड करण्यात आली.