विक्रमगड व वाडा तालुक्यातील ४१२ मजूर सुरक्षा संचाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड व वाडा तालुक्यातील ४१२ मजूर सुरक्षा संचाचे वाटप
विक्रमगड व वाडा तालुक्यातील ४१२ मजूर सुरक्षा संचाचे वाटप

विक्रमगड व वाडा तालुक्यातील ४१२ मजूर सुरक्षा संचाचे वाटप

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) : कामगार विभागांतर्गत येणारे इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणी झालेल्या पालघर जिल्ह्यातील रोजगार हमी व वीटभट्टी मजुरांना मिळणारे अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटप जून महिन्यापासून बंद होते. याबाबत मुंबई कार्यालयातून पालघर कामगार विभाग कार्यालयास संच वाटपाच्या सूचना न दिल्या गेल्याने संच वाटप सेवा बंद होती. याबाबत समर्थन या संस्थेने सातत्याने पाठपुरावा केला. यामुळे आत प्रलंबित असलेली संचवाटप सेवा पुन्हा सुरू होणार आहे. श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने व कामगार विभागाच्या सहकाऱ्याने विक्रमगड येथे संचवाटप शिबिर आयोजित करण्यात आले. यात विक्रमगड व वाडा या दोन तालुक्यातील वीटभट्टी व रोजगार हमी योजनेच्या एकूण ४१२ लाभार्थ्यांना अत्यावश्यक व सुरक्षा संचवाटप करण्यात आले. हे शिबिर श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष तुषार सांबरे यांनी आयोजित केले. यात समर्थनच्या प्रतिनिधी स्नेहा घरत, श्रमजीवी संघटनेच्या पालघर जिल्हा महिला उपप्रमुख रेखा पराड, ज्योती दिघे, पौर्णिमा पवार, ममता दळवी इतर कार्यकर्ते व कामगार विभाग कर्मचारी यांनी सहकार्य केले.