Sun, Jan 29, 2023

वनपाल सुजय कोळी यांना राज्य सरकारचा पुरस्कार
वनपाल सुजय कोळी यांना राज्य सरकारचा पुरस्कार
Published on : 21 December 2022, 10:59 am
कासा, ता. २१ (बातमीदार) : कासा वनविभागाच्या वनपालपदी कार्यरत असलेले सुजय कोळी यांना २०१९-२० या वर्षाचा राज्यस्तरीय वन/वन्यजीव संरक्षण या प्रकारात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य सरकारच्या पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सुजय कोळी यांनी ठाणे वनपालपदी असताना येऊर परिसरातून १९ गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. तसेच बिबट्याची कातडी जप्त करून चार आरोपी पकडले होते. याशिवाय शिकारीसाठी वापरली जाणारी ठासणीची बंदूक आणि एक एअरगन जप्त केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
....
कासा : वनपाल सुजय कोळी यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्रदान केला.