Sun, Feb 5, 2023

धारावीत १६ किलो गांजा पकडला
धारावीत १६ किलो गांजा पकडला
Published on : 21 December 2022, 11:18 am
धारावी, ता. २१ (बातमीदार) : धारावी मुख्य रस्त्यावरील आकाश टॉवर येथे काल (ता. २०) रात्री १६ किलो गांजासह एका २४ वर्षीय व्यक्तीला धारावी पोलिसांनी अटक केली. पकडलेल्या गांजाची किंमत ३,१५,४०० रुपये आहे. गोपनीय बतमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार धारावी पोलिस ठाण्याचे निरीक्षक भारत सलगर, उपनिरीक्षक साळुंखे, रामेश्वर कामशेट्टे यांच्या पथकाने सापळा रचून दोन गोण्या घेतलेल्या संशयित आरोपीस शिताफीने अटक केली. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, सहायक पोलिस आयुक्त गोविंद गंभीरे (कुर्ला विभाग), धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.