पालिकेच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड
पालिकेच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड

पालिकेच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ (बातमीदार) ः मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी आणि वुशू असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने माटुंगा स्पोर्टस् कॉम्प्लेक्स मैदानावर विभागीय वुशू स्पर्धेचे (बॉक्सिंग, जुडो आणि कुस्ती या तीन खेळ प्रकारातून तयार झालेला खेळ) आयोजन केले होते. या स्‍पर्धेत पालिकेच्या सृष्टी गौड, वैष्णवी पाटील आणि फारुख इद्रीसी या तीन स्पर्धकांची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी व वुशू असोसिएशनच्या विद्यमाने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील १७ व १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच वुशू स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहाजी नगर हिंदी महापालिका प्राथमिक शाळेच्या सृष्टी गौड हिने ३६ किलो वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त केले; तर शहाजी नगर महापालिका हिंदी माध्यमिक शाळेच्या फारुख इद्रीसी या स्पर्धकाने ५६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. दुसऱ्या लढतीत ४५ किलो वजनी गटात तुर्भे महापालिका मराठी माध्यमिक शाळेच्या वैष्णवी पाटीलने सुवर्णपदक पटकावले आहे. या तीनही स्पर्धकांना वुशू खेळाचे मार्गदर्शन शिक्षक सुरेश दडस, नितीन गोयकर यांनी केले. या तीनही स्पर्धकांची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, प्रशासनाधिकारी नासिर यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.