संविधान प्रेमींचा शुक्रवारी वसईत मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधान प्रेमींचा शुक्रवारी वसईत मोर्चा
संविधान प्रेमींचा शुक्रवारी वसईत मोर्चा

संविधान प्रेमींचा शुक्रवारी वसईत मोर्चा

sakal_logo
By

नालासोपारा, ता २१ (बातमीदार) : महाराष्ट्रात महापुरुषांबाबत दिवसागणिक बेताल वक्तव्य करून, त्यांना अपमानित केल्या जात असतानाही सरकार मात्र शांत आहे. या सर्व घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी फुले, शाहु, आंबेडकर विचार मंच - वसई तालुक्याच्या वतीने शुक्रवार २३ डिसेंबरला नालासोपारा पूर्व पोलिस उपायुक्त कार्यालयावर सकाळी ११ वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात राज्यपाल, मंत्री, हे महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करतात आणि त्यांना सत्ताधारी आमदार समर्थन करतात, घरात घुसून मारण्याची धमकी देतात, पण त्यांच्यावर कारवाही होत नाही. अशा वाचाळविरांवर कारवाई, व्हावी ही मागणी घेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वसई विरार महापालिका शहर जिल्हाध्यक्षा गीता जाधव यांनी सांगितले.