Fri, Feb 3, 2023

उर्फी जावेदला धमकी देणारा अटकेत
उर्फी जावेदला धमकी देणारा अटकेत
Published on : 21 December 2022, 2:27 am
मुंबई, ता. २१ : टीव्ही अभिनेत्री ऊर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला गोरेगाव पोलिसांनी बिहारच्या पाटणामधून अटक केली आहे. नवीन गिरी असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी नवीन गिरीने ऊर्फीला व्हॉट्सअॅपवरून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. तो वारंवार विविध मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून ऊर्फीला धमकी देत होता. अखेर त्रासून तिने गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून दिले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित आरोपीचा शोध सुरू केला. त्यानुसार त्याला पाटणामधून अटक केली आहे.