खड्ड्यात पडून चिमुलकलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यात पडून चिमुलकलीचा मृत्यू
खड्ड्यात पडून चिमुलकलीचा मृत्यू

खड्ड्यात पडून चिमुलकलीचा मृत्यू

sakal_logo
By

पनवेल, ता. २१ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्थानकाजवळ बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यामध्ये पडलेल्या माही सिद्धेश्वर वाघमारे (वय ३) या चिमुकलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २१) दुपारी घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या खड्ड्यांना कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

नवीन पनवेलमधील पंचशील नगरलगत रेल्वेच्या नवीन रुळांचे काम चालू असून त्यासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यामध्ये पाणी साचले असून या खड्ड्याजवळ बुधवारी दुपारी जवळच असलेल्या पंचशील नगर झोपडपट्टीत राहणारी चिमुकली माही वाघमारे ही खेळत होती; मात्र चुकून ती या खड्ड्यातील पाण्यात पडली. हा प्रकार काही प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर खड्ड्यातील पाण्यात पडलेल्या माहीला बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल केले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.