भिवंडीत शाळा परिसरात गटारे तुंबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत शाळा परिसरात गटारे तुंबली
भिवंडीत शाळा परिसरात गटारे तुंबली

भिवंडीत शाळा परिसरात गटारे तुंबली

sakal_logo
By

भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : भिवंडी महापालिका क्षेत्रात स्वच्छता विभागाच्या कामचुकारपणामुळे शहरातील अनेक ठिकाणी गटारे तुंबून राहिल्याने गटारामधील सांडपाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील नारपोली देवजीनगर या ठिकाणी महापालिका शाळा क्रमांक ४० व ४३ असून या शाळेजवळील रस्त्यालगत असलेले गटार गेले कित्येक दिवस साफ करण्‍यात आलेले नाही. त्यामुळेच या गटारामध्ये तुंबलेले सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
विशेष म्हणजे या महापालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये तब्बल ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी साचलेले असताना आजूबाजूला परिसरात कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. या वस्तुस्थितीकडे महापालिका स्वच्छता विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पालिकेच्या मुख्य कार्यालयातून स्वच्छता अभियानाचा डंका वाजत असताना अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसते. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्य समस्या उद्‍भवत असल्याची माहिती स्थानिक माजी नगरसेविका साखराताई बगाडे यांनी दिली.